क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखकृषी जागरण
साठवणुकीतील गव्हाचे सोंड किडीपासून संरक्षण!
गहू पीक घेतल्यानंतर शेतकऱ्यांना ते सुरक्षितपणे साठवणे फार महत्वाचे आहे. जर पिके योग्य प्रकारे साठवले नाही तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. कृषी वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गहू साठवताना शेतकऱ्यांनी पूर्ण काळजी घेतली पाहिजे कारण पिकाच्या नुकसानीचा धोका जितका उभ्या पिकात आहे तेवढाच साठवणुकीत देखील आहे. गहू साठवण्यामध्ये जर शेतकरी दुर्लक्ष करीत असतील तर त्यांची संपूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. कृषी शास्त्रज्ञ अशी शिफारस करतात की, गहू साठवताना बऱ्याच किडी, बुरशी आणि धान्याला ओलावा लागण्याची भीती असते, म्हणून शेतकऱ्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. गव्हाच्या साठवणुकीतील सर्वात मोठा शत्रू म्हणजे सोंड किडा:- कृषी तज्ज्ञांच्या मते, गव्हाला हि कीड लागण्याची शक्यता असते. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. तसेच पिकामध्ये कोळी किडीचा प्रादुर्भाव असल्यास, धान्यातुन भुकटी येऊ लागते, ज्यामुळे गहू पोकळ होतो. या प्रकरणात धान्य साठवण्यापूर्वी काही खास उपचार करणे गरजेचे आहे. सोंड किड्यापासून गव्हाचे संरक्षण:- प्रथम गहू उन्हात चांगला वाळवा. गव्हामध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसेल हे लक्षात घ्या. जिथे गहू साठवायचा आहे त्या ठिकाणी उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी सुमारे १०० भाग पाण्यात मॅलेथिऑनचा एक भाग मिसळा व हे द्रावण शिंपडा. गहू साठवण गोदाम पक्के असावे. जर गोदामाला चिरा किंवा छिद्र असतील तर ते सिमेंटने लपून घ्यावे. प्रथम कोठार पूर्णपणे स्वच्छ करा. सल्फास किंवा फॉस्फरसच्या धुरामुळे निर्जंतुक केले जाऊ शकते. धान्यांच्या गोण्या थेट जमिनीवर ठेवू नयेत. धान्य जमिनीपासून कमीतकमी १० ते १२ इंच उंच ठेवण्याची सोय करावी. गोदामात धान्य भरल्यानंतर दरवाजे आणि खिडक्या बंद कराव्यात.
संदर्भ:- कृषी जागरण_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
102
4
संबंधित लेख