क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताअॅग्रोवन
टोळधाडीकडून सर्वाधिक नुकसान!
मध्यप्रदेश मार्गे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा चुरणी, बगदारी भागात सर्वात आधी टोळधाड दाखल झाली.या भागात आदिवासी शेतकरी वांगी,चवळी तसेच इतर वेलवर्गीय पिके घेतात भाजीपाल्याचे सुमारे २५ ते ३० टक्के नुकसान या किडीचे केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यानंतर मोर्शी तालुक्यातील भिवकुंडी,पाळी या भागात संत्रा झाडावरील नवतीचा फडशा टोळधाडीकडून पाळण्यात आला.सध्या आंबिया बहरातील लिंबाच्या आकाराची फळे झाडावर आहेत.संत्रा उत्पादकांचे देखील ३०-३५ टक्के नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ४५० लिटर रसायनाची फवारणी. टोळधाड नियंत्रण रात्रीच शक्य असल्याने नागपूर विभागात अग्निशामकाचे दोन बंब वापरून फवारणी करण्यात आली.शेतकऱ्यांवरील चार ट्रॅक्टरचलीत ब्लोअरचा वापर करण्यात आला आहे.रात्रभरात सुमारे २५० लिटर क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. या कीटकनाशकांची फवारणी केली गेली.२.४ मिली प्रति लिटर या मात्रेत कीटकनाशक होते, असे नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी सांगितले.अमरावती विभागीय कृषी सह संचालक सुभाष नागरे यांचे पथकही रात्रभर शिवारात होते.दोन अग्निशमन बंब तसेच शेतकऱ्यांकडील ब्लोअरच्या माध्यमातून २०० लिटर रसायनाची फवारणी करण्यात आली.अशाप्रकारे सुमारे ४५० लिटर रसायन नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात टोळधाड नियंत्रणासाठी वापरण्यात आले. संदर्भ - २७ मे २०२० अ‍ॅग्रोवन,
यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
8
0
संबंधित लेख