हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, व पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा कमी दाब राहील. तसेच मान्सून वारे दक्षिणेकडून नैऋत्येकडून भारताच्या उत्तरेस वाहतील. मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणण्याचे काम करतील. केरळमध्ये मान्सूनच्या पावसास मी आखिरीस सुरुवात होईल. सतत ५ दिवस दररोज पाऊस केरळ भागावर झाल्यानंतर केरळात मान्सून दाखल झाला असे घोषित केले जाते. सध्या मान्सूनने अंदमान भाग पूर्ण व्यापून तो केरळच्या दिशेने आगेकूच करेल व वेळेवर मान्सून दाखल होईल.
तसेच सध्याचे हवेचे दाब असे दाखवतात कि मान्सून केरळमधून तळकोकण आणि मुंबई आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ तसेच उत्तरेस फारसे अडथळा न आणता आगेकूच करतील अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. या आठवड्यात विर्दभातील कमाल तापमान, अमरावती जिल्ह्यात ४७ अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या हवामानाच्या अंदाजनुसार शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. संदर्भ:- डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
7
0
संबंधित लेख