क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
जाणून घ्या, आपल्या भागातील हवामानाचा अंदाज!
अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन लवकर होण्याचे प्रमुख कारणे म्हणजे, प्रदूषण कमी, हवामान बदलाचं परिणाम, कमी जागतिक तापमान वाढीचा वेग कमी झाल्यानेच मान्सून निर्धारित वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणे शक्य आहे. त्याची प्रमुख कारणे म्हणजे दक्षिण भारतात व उत्तर भारतातील हवेचे दाब कमी झाले आहेत. महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर उत्तर भारतातील काश्मीर, उत्तरप्रदेश भागावर केवळ १००२ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब झाले आहेत. त्यामुळेच मान्सून केरळात १ जूनला दाखल होतो तो २८ मे पर्यंत दाखल होणे शक्य आहे तर कोकणात तो ५ जूनला दाखल होतो तेथेही तो १ जून पर्यन्त दाखल होणे शक्य आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात हि मान्सून त्याचे निर्धारित वेळेपूर्वी दाखल होणे शक्य आहे. या शिवाय बंगालचे उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असून निर्माण होत असलेले चक्रीवादळ ओरिसा कोनारपट्टीकडून ईशान्य भारताच्या दिशेने जात आहे.
१७ मे रोजी, या आठवड्यात कोकणातील सर्वच जिल्ह्यात, तसेच नाशिक, धुळे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली व मराठवाडामध्ये पावसाची शक्यता आहे. परंतु पश्चिम विदर्भ व मध्य विदर्भात पावसाची शक्यता कमी आहे. वरील हवामानाच्या अंदाजानुसार, पावसाचे आगमन लवकर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पूर्वमशागतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करून पेरणीसाठी जमीन तयार करावी. २) नवीन फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करून तळस पालापाचोळा व १ ते १.५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २ ते ३ घमेली शेणखत टाकून खड्डा पोयटा मातीने भरावा. ३) भात पिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार कराव्यात. ४) भात खाचरांची बांधबंदिस्ती करावी. "संदर्भ:- डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
18
0
संबंधित लेख