क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताअॅग्रोवन
इंडोनेशिया,इराणकडून साखरेला मागणी! लॉकडाऊनच्या काळात उद्योगाला दिलासा.
गेल्या २ महिन्यांपासून साखर निर्यातीबाबत निराशेच्या गर्तीत सापडलेल्या साखर उद्योगाला आता इंडोनेशिया आणि इराणने दिलासा आहे.दोन्ही देशांत लॉकडाऊन मुळे साखरेला चणचण भासू लागली आहे.यामुळे या देशांना भारतीय साखरेला पसंती दिली आहे. स्थानिक बाजारात उठाव नसला तरी निर्यातीला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.दोन्ही देशांकडून भारतीय साखरेला अपेक्षित आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत.ही बाब मरगळलेल्या साखर उद्योगाच्या पथ्यावर पडणार आहे.दुसरीकडे बंदरावरील अडचणी दूर होत आहेतच पण पांढऱ्या साखरेचे दरही काही प्रमाणातवाढल्याने या सगळ्याचा एकत्रीत सकारात्मक परिणाम पावसाळ्यापूर्वी दिसून येण्याची शक्यता आहे.
बंदरातून निर्यातीसाठी पोषक वातावरण मुंबई बंदर वगळता इतर बंदरातून मजूर उपलब्ध होत आहेत. मार्चचा उत्तरार्ध तेएप्रिलच्या शेवटच्या सप्ताहपर्यंत निर्यातीसाठी असणारी प्रतिकूल परिस्थिती हातात बदलत आहे. यामुळे साखर निर्यातीसाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. रखडलेली साखरही निर्यातीच्या मार्गावर आहे.इंडोनेशिया व इराण मध्ये लॉकडाऊन मुले साखरेची चणचण भासू लागली आहे. याचा परिणाम तेथील देशातील साखर दर वाढण्यावर झाला.मागणी व पुरवठा नियंत्रित करण्यासाठी दोन्ही देश आयातीचे पर्याय शोधत आहेत .त्यांचा काळ भारतीय साखरेकडे रहात असल्याने हे भारतीय साखरेसाठी सुचिन्ह असल्याचे साखर उद्योगातील तज्ञांनी सांगितले. केंद्राकडून प्रयत्न केंद्रीय खाद्य व् सार्वजानिक वितरण विभागाने १ मे ला एक अधिसूचना जारी केली आहे.साखर निर्यातीसाठी माहिती देण्याची मुदत २० जूनपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ती ३१ मार्च इतकी होती या अधिसूचनेमुळे कारखान्यांना जूनपर्यंत जास्तीत जास्त साखर निर्यात करता येऊ शकेल असे साखर उद्योगातील तज्ञांनी सांगितले.केंद्राने जे कारखाने या कालावधीत निर्यात करणार नाहीत.त्यांचा कोटा इतर कारखान्यांना देण्याचेही सूचित केले आहे. संदर्भ - ४ मे २०२० अॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
31
0
संबंधित लेख