AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीAnand 4 You
ट्रायकोडर्मा' जैविक बुरशीनाशक
‘ट्रायकोडर्मा’ हि हिरव्या रंगाची एक प्रकारची उपयुक्त बुरशी/कवक आहे. ट्रायकोडर्मा बुरशी विशेषतः मातीतून उद्भवणाऱ्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी एक फार प्रभावी जैविक पद्धत आहे. रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर पिकावरील रोग नियंत्रणासाठी होत आहे. अत्यंत कमी खर्चात ट्रायकोडर्मा ट्रीटमेंट आहे. ट्रायकोडर्मा शेतकऱ्यांना ऐक वरदान आहे. ट्रायकोडर्माचा विविध ७० प्रजाती पैकी ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ट्रायकोडर्मा हर्जीयानम, ट्रायकोडर्मा अस्पेरेलीयम, ट्रायकोडर्मा अट्रोव्हीरीडी, ट्रायकोडर्मा हम्याटम या मोठ्या प्रमाणात जैविक नियंत्रणात वापरल्या जातात. रोगकारक बुरशींमुळे कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, फळपिके व ऊस अशा विविध पिकांवर मूळकूज, खोडकुज, कॉलर रॉट, मर रोग, कंद सड ई. रोग होतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होते. जमिनीत असणाऱ्या हानिकारक, रोगकारक बुरशी - जसे पिथिअम, फायटोप्थोरा, मॅक्रोफोमिना, स्क्लेरोशिअम, रायझोक्टोनिया, फ्युजॅरिअम, इत्यादींचा नियंत्रणसाठी ट्रायकोडर्माचा वापर करणे फायद्याचे ठरते. ट्रायकोडर्माचा उपयोग बीज प्रक्रिया, माती प्रक्रिया, आळवणी, फवारणी तसेच जमिनीतून मातीमध्ये मिसळून केला जातो. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
संदर्भ:- Anand 4 You हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
24
2