कृषि वार्ताअॅग्रोवन
तांदळाच्या हंगामाला उशिराने सुरूवात
पुणे: यंदा मान्सूनचे उशिरा आगमन व रखडलेल्या मुक्कामामुळे भाताच्या लागवडी उशिरा झाल्या आहेत. त्यामुळे काढणीचा हंगाम ही लांबला आहे. डिसेंबरमध्ये सुरू होणारा तांदळाचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे तांदळाचे उत्पादन २० टक्क्यांपर्यंत घटले. तसेच आंबेमोहर तांदळाच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याबाबत पुणे बाजार समितीमधील प्रमुख विक्रेते राजेश शहा म्हणाले, दरवर्षीप्रमाणे नवीन तांदूळाच्या आवकेला प्रारंभ झाला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे यंदा भाताचे २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. तर हंगामदेखील एक ते दीड महिना उशिराने सुरू झाला आहे. सध्या आवक असलेल्या तांदळामध्ये प्रामुख्याने पारंपारिक बासमती व त्याचे उपप्रकार तिबार, दुबार, मिनी दुबार, मिनी मोगरा, ११२१, १५०९ व १४०१ प्रकारचा बासमती त्याचबरोबर मध्य प्रदेशातील कालीमूच्छ, लचकरी कोलम व एचएमटी कोलम, आंध्र, मध्य प्रदेशातील सुगंधी आंबेमोहोर, कर्नाटकातील स्टीम व कोल्ड कोलम, सोनामसुरी व महाराष्ट्रातील सुवासिक इंद्रायणी अशा विविध प्रकारच्या तांदळांचा समावेश आहे. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, ८ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
11
0
संबंधित लेख