कृषि वार्तालोकमत
शेतकऱ्यांना लाल तांदळाचे आकर्षण!
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाने लाल तांदळाचे वाण विकसीत केले असून, औषध गुणधर्म असलेल्या तांदळाला चांगलीच पसंती मिळाली आहे. पश्चिम विदर्भात नवे तंत्रज्ञान वापरून कृषी विदयापीठातर्फे प्रथमच धान पिकाचा प्रयोग करण्यात आला आहे. धानाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनही देत आहे. याच अनुषंगाने अकोल्यातील राज्यस्तरीय कृषी प्रर्दशनात दर्शनी भागात ठेवलेला लाल तांदुळ शेतकऱ्यांचे आकर्षण ठरला.
धान पिकाचे विदर्भात ७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. पूर्व विदर्भात सर्वाधिक धान पीक घेतले जाते. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाच्या धान संशोधन केंद्राने तांदळाच्या विविध वाणांवर संशोधन केले असून, आता साकोली रेड राईस-१ या नावाने लाल तांदुळ विकसीत केला आहे. संदर्भ – लोकमत, ३१ डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
14
0
संबंधित लेख