क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात काही भागात उष्णता वाढेल
राज्यावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील्यामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण राज्यातील सर्वच जिल्हयात घटेल. उत्तर, पश्चिम व मध्य राज्यासोंबतच मराठवाडयात ते प्रामुख्याने जाणवेल. मराठवाडयातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात आकाश अंशत: ढगाळ राहून वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. विदर्भात कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. लातूर जिल्हयात ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्यामुळे या आठवडयात या भागात उष्णता वाढेल. बाष्पीभवनाचा वेग ही वाढेल. पाण्याची गरज वाढेल. तापमान वाढल्याने विदर्भ, मराठवाडा व पश्चिम राज्यावरील हवेचे दाब कमी होतील व ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. कोकणावर मात्र १००८ हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. हा हवेचा दाब २१ ते २३ एप्रिल काळात राहतील. २४ व २६ एप्रिलला हवेच्या दाबात किंचित वाढ होऊन ते १००८ हेप्टापास्कल राहतील.
कृषी सल्ला: १ गारपीट झालेल्या भागातील कांदा, गहू या पिकांचे नुकसान झाले असेल तेथील कांदा काढून पातीसह उन्हात सुकू दयावा व २ ते ३ सेंमी देठाकडील पातीचा भाग ठेवून पात कापून कांदा चाळीत साठवावा किंवा बाजारात विक्री करावी. २. गव्हाची कापणी करून सुडया बांधून उन्हात वाळू द्याव्यात व नंतर मशिनद्वारे मळणी करावी. ३. भुईमूग व भाजीपाला पिकास ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. ४. हळद व आले लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
13
0
संबंधित लेख