क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताकृषी जागरण
‘या’ शेतकऱ्यांसाठी आकस्मिक निधीतून २ हजार कोटी
मुंबई: राज्यातील खरीप हंगाम २०१८ मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील १५१ तालुक्यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. केंद्र शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या १५१
तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मदतीसाठी सुमारे ७ हजार ९०३.७९ कोटी इतकी रक्कम लागणार होती. त्यापैकी यापूर्वी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार इतका निधी यापूर्वीच विभागीय आयुक्तांकडे वितरित करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीपोटी तातडीने मदत वाटप करण्यासाठी २ हजार कोटींचा आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाने १२ फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाने दुष्काळी तालुक्यांमध्ये हा निधी वितरित करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आले आहेत._x005F_x000D_ _x005F_x000D_ संदर्भ – कृषी जागरण, २३ फेब्रुवारी २०१९
5
0
संबंधित लेख