AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जीवाणु खतांचे फायदे व वापरताना घ्यावयाची काळजी
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जीवाणु खतांचे फायदे व वापरताना घ्यावयाची काळजी
१ .सेंद्रीय पदार्थाचे लवकर विघटन होते. २ .बियाणांच्या उगवण क्षमतेत वाढ होते. ३. पिकांची जोमदार वाढ होते व पिकांची रोगप्रतिकार शक्तीतही वाढ होते. ४. नत्रयुक्त जीवाणु खतांमुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
५. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद पिकांना उपलब्ध करून दिला जातो. ६ .जमिनीचा पोत सुधारतो. ७ .ही खते नैसर्गिक असल्याने याचा पिकांवर व जमिनीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. ८. ही खते ठिबक मधून देता येत असल्यामुळे मजुरांवरील खर्च कमी होतो. जीवाणु खत वापरताना घ्यावयाची काळजी १ .जीवाणू खताची बाटली किंवा पॅकेट यांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावे. ते सावलीत ठेवावे. २. जीवाणु संवर्धन लावलेले बियाणे रासायनिक खतात मिसळू नये. ३. बुरशीनाशक किंवा किटकनाशक लावायची असल्यास ती प्रक्रिया पूर्ण करून शेवटी जीवाणु खत लावावे. ४. जीवाणु खत ठीबकद्वारे देताना रासायनिक खतात किंवा इतर औषधामध्ये मिसळू नयेत. ५. बाटली वर दिलेलेया अंतिम तारखेच्या आतच त्याचा वापर करावा. अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ३ मे १८
98
0