AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करा तणांचे नियंत्रण
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करा तणांचे नियंत्रण
शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी निविष्टा चा योग्य वापर करून अधिक उत्पादन काढणे आवश्यक बनले आहे .पिकांच्या वाढत्या काळात तण नियंत्रणाची विशेष काळजी घेतल्यास नुकसान कमी प्रमाणात होते .तणामुळे अन्नद्रव्य पाणी प्रकाश व जागेसाठी स्पर्धा होते .तणामुळे अन्नद्रव्य पाणी प्रकाश व जागेसाठी स्पर्धा होते .
• ताणामुळे होणारे नुकसान अनेक प्रकारचे आहे 1. तणामुळे उत्पादनात घट 2. पिकांच्या दर्जात घट होते 3. उत्पादन खर्चात वाढ होते 4. पाण्याच्या पाटाची कमी वाहन क्षमता 5. अवजारांची झीज होते • तणे पिकाबरोबर पाणी अन्नद्रव्य व प्रकाश यासाठी स्पर्धा करतात पिकाच्या उत्पादनात १६ ते ६० टक्क्यापर्यंत घट येऊ शकते • तणे वाढलेल्या शेतातून जे पिक काढले जाते त्यात तणांचे बी व अवशेष यामुळे त्यांची बाजारातील किंमत कमी होते शिवाय प्रत हि खराब होते उदा. मेथी,पालक यासारख्या भाजीच्या जुडीत तणाची हिरवी पाने मिसळली तर त्याचा भाव कमी होतो. • पिक उत्पादन’खर्चाच्या ३० %टक्के खर्च मशागती वर होतो तणे जास्त असल्यास हा खर्च आणखी वाढतो • कीटक पिक शेतात नसेल तेव्हा तणाचा आधार घेतात व पिक वाढले कि त्यावर येतात व नुकसान करतात • पाण्याच्या पाटातुन वाढलेल्या तणामुळे त्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो • तण नियंत्रणासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय • स्वच्छ बी बियाणे वापरावे प्रमाणापेक्षा जास्त तणाचे बी असल्यास त्यामुळे तणांचा प्रसार होतो. • चांगले कंपोस्ट व शेणखत वापरणे त्यामुळे तणाची उगवण क्षमता नाहीशी होते • शेताचा बांध,पडीकजमीन,पाण्याचा पाट असलेली तणे वेळेवर उपटून नाहीशी करावी - पिकामधील तण नियंत्रण खालील पद्धतीने करता येते • यांत्रिक पद्धत-यात मुख्यत निंदणी व कोळपणी यांचा वापर करतात . • रासायनिक पद्धत- तणनाशकाचा वापर • जैविक पद्धत –विविध जीव ,जीवाणु ,बुरशी ,किडी इ वापर • एकात्मिक पद्धत- एकाच वेळी अनेक पद्धतीचा तण नियंत्रणासाठी वापर करणे - पिकातील तण नियंत्रण • ज्वारी –बाजरी –अट्राझीन तणनाशक २०० ग्राम /एकरी ४०० लिटर पाण्यात मिसळून पिक उगवणी पूर्वी फवारणी करावी व सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी • मका –अट्राझीन ४०० ग्राम /एकरी ४०० लिटर पाण्यात मिसळून बियाणे उगवणी पूर्वी फवारणी करावी. सहा आठवड्यांनी खुरपणी करावी . • कपाशी-पेन्डीमेथॅलीन ३०० ग्राम /एकरी ४०० लिटर पाण्यात फवारावे व सहा आठवड्यांनी खुरपणी करावी. • ऊस- बेणे उगवण्यापूर्वी अट्राझीन ४०० ग्राम / एकरी ४०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आठ आठवड्यांनी खुरपणी करावी. • सोयाबीन - पेन्डीमेथॅलीन ३०० ग्राम /एकरी ४०० लिटर पाण्यात फवारावे व सहा आठवड्यांनी खुरपणी करावी. - तणनाशक फवारताना घ्यायची काळजी • तणनाशक नेहमी जोराचे वारे चालू नसताना फवारावे • तणनाशक ढगाळ वातावरण असताना फवाराणी करू नये • फवारणी नंतर शेतात ३ ते ४ आठवडे कसलीही मशागत करू नये • तणनाशक फवारताना पाठीवरचा नॅपसॅकचा वापर करावा • तणनाशके विकत घेताना त्यावरील तारीख तपासुन घ्या
16
1