AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी उत्पादनांची निर्यात वाढणार
कृषि वार्ताप्रभात
कृषी उत्पादनांची निर्यात वाढणार
नवी दिल्ली – वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे याकरिता कृषी उत्पादनांची निर्यात वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने २०२२ पर्यंत उत्पादनाची निर्यात ६० अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे ठरविले असल्याची माहिती केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी दिली. गोयल म्हणाले, यासाठी देशातील कृषी उत्पादनाच्या सहकारी संस्थांचा एक मंच तयार केला जाणार आहे. निर्यातदारांना आयातदाराशी संवाद साधता यावा याकरिता ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय सहकार व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशात ८ लाख सहकारी संस्था आहेत. देशातील १५ कोटी शेतकऱ्यांपैकी ९४ टक्के शेतकरी या सहकारी संस्थांशी संलग्न आहेत. या संस्थाच्या माध्यमातून कृषी उत्पादनांची निर्यात वाढविण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. संदर्भ – प्रभात, ३ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
23
0