AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तणनियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तणनियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब!
तणनियंत्रण करण्यासाठी नेहमी एकात्मिक पद्धतीचाच वापर करावा. याचा अर्थ असा होता कि दोन ते तीन संपूर्ण वेगळ्या पद्धतींची सांगड घालावी. 1) व्यवस्थापकीय पद्धत :- हि तण नियंत्रणाची अप्रत्यक्ष पद्धत आहे असे म्हणायला हरकत नाही. वेळेवर, योग्य खोलीवर व नेमक्या अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा अचूक पद्धतीने देणे, एकरी रोपांची संख्या योग्य राखणे, नेमके जलव्यवस्थापन, आंतरपीक घेणे यांचा या पद्धतीत समावेश होतो. 2) भौतिक/यांत्रिक पद्धत :- या पद्धतीत तण उपटणे, निंदणी-खुरपणी, कोळपणी करणे, पेरणीपूर्व वखराचीपाळी मारणे, मल्चिंग (प्लास्टिक, अवशेष) करणे अशा पद्धतींचा समावेश होतो. 3) रासायनिक पद्धत :- या पद्धतीत रासायनिक तणनाशकांचा उपयोग करण्यात येतो. तणनाशकाचे परिणाम जितके स्पष्ट दिसतात तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील स्पष्ट असतात त्यामुळे यांचा उपयोग व्यवस्थित अभ्यास करूनच करावा. काही तणनाशके आंतर प्रवाही असतात. ते पिकाच्या आत शोषले जातात व त्यानंतर परिणाम दाखवतात. परिणाम दिसायला ३-४ दिवस लागतात उदा. ग्लायफोसेट • स्पर्शजन्य तणनाशके लगेच परिणाम दाखवतात पण त्यांची फवारणी नीट व्हायला हवी. उदा पॅराक्वाट, ओक्झीफ्लुरफेन, डायक्वाट आणि ब्रोमोक्झीनील • निवडक तणनाशके- यांची प्रमाणबद्ध फवारणी केल्यास तण जळते व मुख्य पिकास काहीही होत नाही. जसे एट्राझीन, पेंडीमिथिलीन • बिन-निवडक तणनाशके - सर्व प्रकारच्या वनस्पती साठी घातक असतात जसे पेराक्वाट, ग्लायफोसेट • अवशेषजन्य तणनाशके - यांचे अवशेष जमिनीत टिकून रहातात व नंतर अंकुरणाऱ्या तणांचा नाश करतात. • अवशेषविरहीत तणनाशके - यांचे अवशेष जमिनीत टिकून रहात नाहीत. 4) जैवक नियंत्रण :- कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करून तणनियंत्रण करता येते. उदा. गाजरगवताचे नियंत्रण करण्यासाठी त्यावर मेक्‍सिकन भुंगे सोडण्यात येतात किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा गवत घेऊन गजरगवताच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते. शेतकरी बंधूंनो अचूक तणनियंत्रणातून नक्कीच उत्पादनात वाढ होते. मुख्य पिकाला वाढायला पूर्ण वाव मिळतो.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
118
9
इतर लेख