AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकारी आकडेवारीनुसार लॉकडाऊनचा अशा प्रकारचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला, पेरणीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाल्याने शेतीविषयक कामे वाढत गेली
कृषी वार्ताAgrostar
सरकारी आकडेवारीनुसार लॉकडाऊनचा अशा प्रकारचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला, पेरणीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाल्याने शेतीविषयक कामे वाढत गेली
भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतकरी आणि शेतीची कामे सुलभ करण्यासाठी विविध प्रयत्न केले गेले_x000D_ लॉकडाउन -2 मुळे २५ एप्रिलपर्यंत देशातील सर्व घाऊक मंडी बंद करण्यात आल्या. भारत सरकारने मान्यता दिलेल्या २५८७ प्रमुख / मुख्य कृषी बाजारपेठा असून त्यापैकी १०९१_x000D_ एप्रिल रोजी १०९१ बाजारपेठा कार्यरत होत्या. २३ एप्रिल पर्यंत २०६७ बाजारपेठा कार्यान्वित झाल्या आहेत._x000D_ देशातील २० राज्यांत किमान आधारभूत किंमतीवर डाळी व तेलबियांची खरेदी चालू आहे. नाफेड आणि एफसीआयने १,७९,८५२.२१ मेट्रिक टन डाळ आणि १,६४,१९५.१४ मेट्रिक टन तेलबिया खरेदी केल्या आहेत, ज्याचा फायदा २,०५,८६९ शेतकऱ्यांना झाला आहे._x000D_ उन्हाळी पिकाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ_x000D_ तांदूळः मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत २५.२२ लाख हेक्टर भात पेरणी झाली होती, ती आता वाढून 34.७३ लाख हेक्टर झाली आहे._x000D_ डाळी: मागील वर्षाच्या तुलनेत डाळींनी पेरलेले क्षेत्र ३.८२ लाख हेक्टरवर आता वाढून ५.०७ लाख हेक्टर झाले आहे._x000D_ तृण धान्ये: मागील वर्षीच्या तुलनेत या काळात ५.४७ लाख हेक्टर पेरणीचे क्षेत्र आता बऱ्याच प्रमाणात ८.५५ लाख हेक्टरवर गेली आहेत._x000D_ तेलबिया: तेलबियाचीही लागवड मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ८.७३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे, त्यावेळी ६.८० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे._x000D_ 24 एप्रिलपर्यंत रबी पिकाची काढणीची स्थिती_x000D_ गहू: राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत मध्य प्रदेशात सुमारे ९८-९९% गहू पिकाची कापणी झाली आहे, राजस्थान राज्यात ९०-९२ %, उत्तर प्रदेशात ८२-८५%, हरियाणा मध्ये ५०-५५%, पंजाब मध्ये ४५-५०५ इतर राज्यात ८६-८८% पीक काढणी झाली आहे._x000D_ याचा अर्थ असा की या सरकारी आकडेवारीनुसार लॉकडाऊनचा शेतकऱ्यांवर परिणाम झाला नाही. जर नसेल तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा शेतकरी वेगाने काम करीत आहेत_x000D_ _x000D_ संदर्भ - कृषी जागरण २५ एप्रिल २०२०,_x000D_ यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_ _x000D_
172
0
इतर लेख