AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘या’ गवतामुळे वर्षाला गहूचे ४ हजार करोडचे नुकसान होते
कृषी वार्ताAgrostar
‘या’ गवतामुळे वर्षाला गहूचे ४ हजार करोडचे नुकसान होते
सध्या भारतासहित २५ देशांमधील शेतकऱ्यांना ‘चिकटा’ गवतामुळे नुकसान होत आहे. मुख्यत: या गवतामुळे गहू पिकाचे ८० टक्के उत्पादन कमी होत आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना जवळजवळ वर्षाला ४ हजार करोडचे नुकसान होत आहे. ही समस्या फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्येदेखील निर्माण होत आहे. या संदर्भात नुकतीच एशियन पॅसिफिक वीड साइंस सोसाइटी, यांनी मलेशिया येथे २७ वी एपीडब्ल्यूएसएस पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये २५ देशातील ३३० प्रतियोगी सहभागी झाले होते. यावेळी सीसीएस हरियाणा कृषि विश्वविद्यालय (एचएयू) चे अॅग्रोनॉमीचे विभागाचे अध्यक्ष डॉ. समुंदर सिंह यांनी हे गवताला कसा आळा घालायचा याविषयी माहिती दिली.
213
0
इतर लेख