AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
84 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ तीन बाईक बाजरात!
कृषी यांत्रिकीकरणTV9 Marathi
84 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ तीन बाईक बाजरात!
👉 पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि महागणाऱ्या गाड्या यामुळे ग्राहकांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, अजूनही असे बरेच ग्राहक आहेत, जे सेकंड हँड बाइकला पहिला पर्याय मानतात. आजकाल बाजारात अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत ज्या आपल्याला कमी किंमतीत दमदार फीचर्ससह सेकंड हँड बाईक देतात. अशा परिस्थितीत, आपणदेखील बाईक खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आज आपल्यासाठी तीन उत्तम पर्याय आणले आहेत. 👉वापरलेली बाईक खरेदी करण्यासाठी आपण Droom.in ची मदत घेऊ शकता आणि या साईटवर जाऊन आपल्या पसंतीच्या बाईकची निवड करू शकता. चला तर मग संपूर्ण यादी जाणून घेऊया. बजाज पल्सर 👉 या बाईकची भारतात मोठी क्रेझ आहे. 2013 चं मॉडेल असलेली ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. आतापर्यंत ही बाईक 11,000 किमोमीटरपर्यंत धावली आहे. दुसरीकडे, ती बाईक खरेदी केल्यावर, तुम्हाला 65 किमीपर्यंतचं मायलेज मिळेल. या बाईकमध्ये 149 सीसी इंजिन आहे जे 14.85bhp पॉवर देतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही बाईक 29000 रुपयांमध्ये विकली जात आहे. TVS अपाचे RTR 160 4V डिस्क 👉 टीव्हीसची ही रेसिंग बाईक 2019 चं मॉडेल आहे. ही बाईकदेखील फर्स्ट ओनरकडून विकली जात आहे. ही बाईक आतापर्यंत 95,000 किलोमीटरपर्यंत धावली आहे. या बाईकमध्ये 160cc चं इंजिन देण्यात आलं आहे जे 16.10 bhp पॉवर जनरेट करतं. या बाईकचं व्हील 17 इंचांचं आहे. ही गाडी 52,000 रुपयांमध्ये विकली जात आहे. होंडा ड्रीम Yuga 👉 हे 2019 चं मॉडेल आहे. ही बाईक फर्स्ट ओनरद्वारे विकली जात आहे. ही गाडी आतापर्यंत 12,500 किलोमीटरपर्यंत धावली आहे. ही बाईक 84 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. यामध्ये तुम्हाला 110cc चं इंजिन मिळेल, जे 8.25bhp पॉवर देतं. ही बाईक 43,000 रुपयांमध्ये विकली जात आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
3