AgroStar
‘8 अ’ चा उतारा म्हणजे नेमकं काय? अन् त्याचे फायदे!
समाचारTV9 Marathi
‘8 अ’ चा उतारा म्हणजे नेमकं काय? अन् त्याचे फायदे!
➡️ शेतजमिनीची खरेदी असो की विक्री सातबारा उतारा आणि त्याला लागूनच मागणी होते ती ‘आठ अ’ ची. सातबारा उतारावर जमिन कोणाच्या मालकीची आहे. मुळ मालक कोण आहे. जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय? यासंबधीची माहिती सातबारा, फेरफार बदल या रुपाने तहसील कार्यालयात १८८० पासून उपलब्ध आहे. ➡️ मात्र,‘आठ अ’ चा उतारा कळत नाही. तो कसा काढायचा हेही काही लोकांना माहिती नसते. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘आठ अ’च्या उताऱ्यावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या ‘त्या’ गावातील एकूण जमिनींविषयी सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते. ‘आठ अ’चा उतारा कसा मिळवायचा https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जा या ठिकाणी ‘सातबारा’, ‘आठ अ’ पाहण्याचे पर्याय समोर दिसतील. यामध्ये नंतर तुम्हाला विभाग निवडायचा आहे. ➡️ यामध्ये सातबारा की आठ ‘अ’ हे काढायचे ठरवावे लागणार आहे. नंतर ‘आठ अ’ वर क्लीक करा ➡️ त्यांनतर जिल्हा, तालुका आणि गावावर क्लिक करा ➡️ खाते नंबर क्लीक करून तो छोट्या बॉक्समध्ये लिहा.त्यांनतर सर्चवर क्लिक करा ➡️ तुम्हाला तुमचा ‘आठ अ’ चा उतारा मिळतो. ➡️ तलाठी कार्यालयातून देखील आठ अ उतारा घेता येतो. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
16
3
इतर लेख