नोकरी आणि शिक्षणAgrostar
8वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी 'या' बँकेत 288 जागां !
👉🏻ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ बँकिंग सहाय्यक (कनिष्ठ लिपिक), शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2022 असणार आहे.
👉🏻या पदांसाठी भरती :
👉🏻कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक - एकूण जागा - 233
👉🏻शिपाई - एकूण जागा - 55
👉🏻कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता :
१. कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
२. तसंच उमेदवारांनी MSCIT केलं असणं आवश्यक आहे.
३. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
४. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
५. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
६. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
👉🏻शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता :
१. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
२. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
३. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
४. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
५. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
👉🏻इतका मिळणार पगार :
१. कनिष्ठ बँकिंग सहाय्यक कनिष्ठ लिपिक - 15,000/- रुपये प्रतिमहिना
२. शिपाई - 10,000/- रुपये प्रतिमहिना
👉🏻ही कागदपत्रं आवश्यक :
१. Resume (बायोडेटा)
२. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
३. शाळा सोडल्याचा दाखला
४.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
५. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
६.पासपोर्ट साईझ फोटो
👉🏻संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.