agrostar logo
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
790 टन कांदा झाला आयात
कृषि वार्तापुढारी
790 टन कांदा झाला आयात
नवी दिल्ली – आयात केलेल्या 790 टन कांदयाची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. किंमतींमध्ये मोठया प्रमाणात घसरण होण्याची शक्यता कमी आहे. या कांदयाचा बंदरापर्यंत पोहोचण्याचा आयातीचा खर्च प्रति किलो 57 ते 60 रू. झाला आहे, असे सांगण्यात आले आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. डिसेंबरअखेरपर्यंत आणखी 12,000 टन कांदा आणखी आयात होण्याची शक्यता असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील एमएमटीसीने आतापर्यंत ४49,500 टन कांदा आयात करण्याचा करार केला आहे. देशातील बडया शहरांमध्ये कांदयाचे दर 100 रू. प्रति किलो आहेत. काही भागात कांदा 160 रू. किलो आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, 290 टन व 500 टन अशा दोन खेपा यापूर्वीच मुंबईत पोचल्या आहेत. हा कांदा राज्य सरकारांना 57 ते 60 रू. प्रतिकिलो दराने देण्यात येत आहे. तुर्कस्तान, इजिप्त व अफगाणिस्तान या देशातून कांदयाची आयात करण्यात आली आहे. संदर्भ – पुढारी, 26 डिसेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
188
0
इतर लेख