AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
70 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय; होईल मोठी कमाई!
व्यवसाय कल्पनाNews 18 lokmat
70 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय; होईल मोठी कमाई!
➡️ आपल्या घराच्या छतावरच सोलर पॅनल व्यवसायानो, तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमावू शकता. यासाठी तुम्हाला घराच्या छतावर सोलर पॅनल बसवावे लागतील. यासाठी साधारणपणे एक लाख रुपये खर्च येतो. पण, केंद्र सरकारच्या ‘न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालया’तर्फे रुफटॉप सोलर प्लांटसाठी 30 टक्के सबसिडी मिळते. यातून तयार होणारी वीज तुम्ही सरकारला विकू शकता. अवघ्या 70 हजारांमध्ये उभारता येतो प्लांट - ➡️ एक किलोवॅट क्षमतेच्या एका सोलर पॅनलची किंमत सुमारे एक लाख रुपये असते. सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीनंतर ही किंमत 60 ते 70 हजारांपर्यंत जाते. जर तुमच्याकडे प्लांट बसवण्यासाठी लागणारे 70 हजार रुपये नसतील, तर कोणत्याही बँकेतून यासाठी तुम्ही लोन घेऊ शकता. 25 वर्षांपर्यंत होत राहील कमाई - ➡️ सोलर पॅनलचं आयुष्य साधारणपणे 25 वर्षे असतं. आपल्या घराच्या छतावर हे प्लांट झाल्यानंतर यातून निर्माण होणारी वीज आपण वापरू शकतो. तसंच, तुम्ही वापरुन शिल्लक राहिलेली वीज ही ग्रिडच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीला किंवा थेट सरकारला विकू शकता. तुमच्या घराचं वीजबिल ही वाचेल, शिवाय कमाईही होईल. तुमच्या घराच्या छतावर दिवसाचे 10 तास सूर्यप्रकाश पडत असेल, तर दोन किलोवॅटच्या सोलार पॅनलचा वापर करुन तुम्ही दिवसाला 10 युनिट वीज तयार करू शकाल. म्हणजेच, महिन्याला तुम्ही जवळपास 300 युनिट वीज तयार करू शकाल. ➡️ विशेष म्हणजे, हे सोलर पॅनल एकदा बसवले, की किमान दहा वर्षं त्यांच्याकडे पाहण्याची गरज भासत नाही. दर 10 वर्षांनी त्यांची बॅटरी बदलावी लागते. यासाठी सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. तसंच, मधल्या काळात तुम्ही घर बदललं तरी चिंता करण्याची गरज नाही. हे पॅनल सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येतात. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
5
इतर लेख