AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
7वी पास उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी!
नोकरीन्यूज १८ लोकमत
7वी पास उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी!
जिल्हा न्यायालय गडचिरोली इथे लवकरच सातवी पास उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. माळी या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. या पदांसाठी भरती माळी (Gardener) - एकूण जागा ०३ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदरांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे शारीरिक रित्या सुदृढ आणि सक्षम असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी माळीकामात डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना माळीकामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा उमेदवारांचं वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार माळी (Mali) - १५,000 - ४७,६०० रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक १)शैक्षणिक प्रमाणपत्र २)शाळा सोडल्याचा दाखला ३)जात प्रमाणपत्र ४)आधार कार्ड ५)मतदान ओळखपत्र असा करा अर्ज उमेदवारांनी अर्ज करताना एक लिफ़ाफ़ाघेऊन त्यावर पाच रुपयांचं तिकीट लावून आणि स्वतःचा पत्ता लिहावा आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज करण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ ऑक्टोबर २०२१. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
10