AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
7वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती!
नोकरीन्यूज १८ लोकमत
7वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती!
➡️राज्य राखीव पोलीस बल नागपूर गट क्र. ४ इथे लवकरच सातवी पास उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. भोजन सेवक - एकूण जागा ०८ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव १)भोजन सेवक -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. २)तसंच उमेदवारांना शासनानं मान्यता दिलेल्या किंवा प्राधिकरणातंर्गत येणाऱ्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ३)उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा ➡️उमेदवारांचं वय १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीयांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार ➡️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना १५,००० रुपये प्रतिमहिना ते ४७,६०० रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. उमेदवारांचा पगार हा त्यांच्या मुलाखतीवर किंवा अनुभवावर अवलंबून असणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक १)Resume (बायोडेटा) २)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं ३)शाळा सोडल्याचा दाखला ४)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ५)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) ६)पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०४, हिंगणा रोड, नागपूर अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ जानेवारी २०२२ या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठीhttps://maharashtrasrpf.gov.in/ या लिंकवर क्लिक करा संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
10
इतर लेख