हवामान अपडेटAgrostar
6 एप्रिलपर्यंत मुसळधार पाऊस, हवामान घेणार नवा मोड!
👉गेल्या काही दिवसांपासून देशभरात हवामान बदलत असून, अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला आहे. आता महाराष्ट्रातही पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागानुसार, राज्यातील तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असून, पुढील काही दिवसांत काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
👉१७ एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, गारपीट होण्याचीही शक्यता आहे. १८ आणि १९ एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. २० आणि २१ एप्रिलला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
👉पुण्यात १७ एप्रिल रोजी संध्याकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे. १८ व १९ एप्रिल रोजी संध्याकाळी ढगाळ वातावरण होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. २० आणि २१ एप्रिललाही संध्याकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानासोबतच पुढील काही दिवस हवामानात सतत बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.