AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
6 कोटी जनधन खाती निष्क्रिय, यामध्ये तुमचं खातं आहे का?
कृषी वार्ताNews 18 lokmat
6 कोटी जनधन खाती निष्क्रिय, यामध्ये तुमचं खातं आहे का?
➡️ पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत कोट्यवधी जनतेनं बचत खाती उघडली आहेत. बँकिंग सुविधेपासून वंचित असणाऱ्यांना या योजनेचा विशेष फायदा झाला. या घटकासाठीच सरकारने ही योजना सुरू केली होती. केंद्र सरकारने मंगळवारी अशी माहिती दिली की पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत ५.८२ कोटी खाती निष्क्रिय आहेत आणि यामध्ये महिलांच्या निष्क्रिय खात्यांची संख्या जवळपास २.०२ कोटी आहे. ➡️ राज्यसभेत एका लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अशी माहिती दिली की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे दिलेल्या सूचनेच्या आधारे २८ जुलै २०२१ च्या स्थितीनुसार, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत ५.८२ कोटी खाती निष्क्रिय आहेत. कधी निष्क्रिय होतं खातं? ➡️ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, कोणत्याही खात्यात सातत्याने दोन वर्ष जर कोणता व्यवहार झाला नाही तर ते खात निष्क्रिय होऊन जातं. अर्थात ५.८२ कोटी खाती अशी आहेत की ज्यामध्ये गेल्या दोन वर्षात कोणताही व्यवहार झालेला नाही.. बचत खातं जन धन खात्यात बदला ➡️ तुम्ही तुमचं बेसिक सेव्हिंग अकाउंट देखील जन धन खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे त्यांना रुपय PMJDY कार्ड देण्यात येते. तुम्ही SBI मध्ये २८ ऑगस्ट २०१८ पूर्वी जन धन खाते उघडले असेल तर तुम्हाला जारी करण्यात आलेल्या कार्डवर १ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल तर २८ ऑगस्ट २०१८ नंतर जारी करण्यात आलेल्या रुपे कार्डावर २ लाखांपर्यंतचा अॅक्सीडेंट कव्हर बेनिफिट मिळेल. आधार कार्ड तपशील देऊन निष्क्रिय खातं करा सक्रीय ➡️ तुम्ही तुमच्या आधार कार्डावरील माहिती देऊन जन धन खातं सुरू करू शकता. जन धन खात्यात दोन वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही तर ते बंद केलं जातं. खातं तुम्ही व्यवहार करून सक्रीय ठेवू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
2
इतर लेख