AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
50 हजार रुपये भरा आणि वर्षाला 3300 रुपयांची पेन्शन मिळवा!
समाचारTV9 Marathi
50 हजार रुपये भरा आणि वर्षाला 3300 रुपयांची पेन्शन मिळवा!
➡️ पोस्टाच्या अनेक योजना ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकी एक असणारी योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली स्कीम योजना. पोस्ट ऑफिस MIS या नावाने ही योजना लोकप्रिय आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना अत्यंत उत्तम परतावा मिळतो. ➡️ पोस्ट ऑफिस MIS योजनेचा वार्षिक व्याजदर ६.६ टक्के इतका असून तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळते. पोस्ट ऑफिस MIS योजनेत एका व्यक्तीसाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा ४.५ लाख इतकी आहे. तर जॉईंट अकाऊंटसाठी कमाल मर्यादा नऊ लाख रुपये इतकी आहे. योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असतो. योजना नेमकी काय? ➡️ या योजनेत कमीत कमी १००० आणि १०० च्या पटींमध्ये रक्कम जमा करता येते. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त तीन जणांना जाईंट अकाऊंट उघडता येते. तसेच, जर मुल अल्पवयीन असेल तर पालकांच्या नावे खाते उघडले जाऊ शकते. तसेच दहा वर्षानंतर मुलाच्या नावेही पोस्ट ऑफिसमध्ये MIS अकाऊंट उघडता येते. ५ वर्षांची मुदत ➡️ या पोस्ट ऑफिस योजनेची मुदत ५ ​वर्ष आहे. हे अकाऊंट उघडल्यानंतर एक वर्ष होईपर्यंत तुम्ही त्यातून पैसे काढू शकत नाही. जर 3-5 वर्षादरम्यान हे अकाऊंट बंद करु इच्छित असाल, तर १ टक्के दंड कपात केला जाईल. ४.५ लाख जमा केल्यास दर महिना मिळतील २४७५ रुपये जर कोणी या खात्यात एकदा ५० हजार रुपये जमा केले तर प्रत्येक महिन्याला २७५ रुपये म्हणजे वर्षाला ३३०० रुपये मिळतील. तर पाच वर्षात तुम्हाला एकूण १६५०० रुपये व्याज मिळेल. त्याचप्रमाणे जर कोणी १ लाख जमा केले तर त्याला दरमहा ५५० रुपये याप्रमाणे दर वर्षाला ६६०० रुपये मिळतील. त्याशिवाय पाच वर्षात ३३००० रुपये मिळतील. या योजनेत साडेचार लाख रुपये जमा केल्यास दरमहा २४७५ रुपये मिळतील. तर वर्षाला २९७०० रुपये आणि पाच वर्षांत व्याजदर म्हणून १४८५०० रुपये उपलब्ध असतील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
1