AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट!
हवामान अपडेटkrishi jagran
5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट!
➡️मागील काही दिवसांपासून उत्तर भारत विभागामध्ये पाऊसाने तसेच हिमवृष्टीने चांगलीच धो धो लावलेली आहे. पण आता उत्तर भारतातील पाऊसाने थोडी विश्रांती घेतली असल्यामुळे थंडीचा कडाका सुद्धा कमी झालेला आहे. ➡️परंतु दक्षिण भारतामधील ईशान्य बाजूकडील पुन्हा एकदा वारे सक्रिय झाले असल्यामुळे दक्षिण तमिळनाडू तसेच पोंडेचरी, कराईकल, दक्षिण केरळ व माहे परिसरामध्ये पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आज हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे. या जिल्ह्यात कोसळणार पाऊस :- ➡️या अशा परिस्थिती चा काहीसा परिणाम महाराष्ट्र राज्यावर देखील होणार असल्याचे सांगितले आहे. जे की पुढील दोन दिवसात राज्यामध्ये कोरडे हवामान राहणार आहे. ➡️१६ फेब्रुवारी रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. ➡️तर १८ फेब्रुवारी रोजी हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. या ५ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार असून हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगितले गेले आहे. ➡️मागील दोन दिवसांपासून विदर्भ भागामध्ये किमान तसेच कमाल तापमानामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली असून तिथे गरमी चे प्रमाण देखील वाढले आहे. संदर्भ:-कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2
इतर लेख