AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
41 कोटी 60 लाख रुपये अनुदान वाटप!
कृषि वार्ताAgrostar
41 कोटी 60 लाख रुपये अनुदान वाटप!
👉राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती मधून सावरण्यासाठी आणि येणाऱ्या संकटा पासून नौराश्य दूर करण्यासाठी ही योजना कृषी विभागा मार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणाऱ्या अनेक प्रकारचे लाभ तातडीने मिळणून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत च मागेल त्याला शेततळे या घटका अंतर्गत 6 हजार 72 शेततळे पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी आता पर्यत एकूण 41 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात आले आहे. 👉या मध्ये कोकण विभागाला 149, नाशिक विभागाला 1 हजार 70, पुणे विभागाला 2 हजार 907, कोल्हापूर विभागाला 708, छत्रपती संभाजी नगर विभागाला 474, लातूर विभागाला 290, अमरावती विभागाला 187 आणि नागपूर विभागाला 287 असे एकूण राज्यात 6 हजात 72 शेततळे पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेसाठी सरकारने आता पर्यत 41 कोटी 60 लाख 65 हजार 495 रुपयांचे वाटप केले आहे. 👉तसेच आता जर कोणत्या शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत शेततळे मिळवण्यासाठी महाडीबीटी या महापोर्टल वर जाऊन अर्ज करायचा आहे. 👉अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 👉लाभार्थ्यांना फक्त ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच अर्ज करता येणार आहे. 👉शेत तळ्याचा लाभ मिळवायचा असेल तर किमान साठ गुंठे जमीन आवश्यक आहे. 👉अर्जदाराने या पूर्वी कोणत्याही सरकारी योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा. 👉लाभ देताना दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना अधिकचे प्राधान्य देण्यात येणार आहे. 👉संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख