कृषि वार्ताAgroStar
3.50 लाखांचा सोलर पंप फक्त 12 हजार रुपयांत!
👉🏻केंद्र सरकारच्या माध्यमातून सबंध देशभर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली आहे.महाराष्ट्रात महा कृषी ऊर्जा अभियान राबविले जात आहे.अलीकडेच राज्यात कुसुम-ब योजना अर्थातच कुसुम योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे.पात्र तसेच इच्छुक शेतकऱ्यांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
👉🏻किती क्षमतेचे सौर कृषी पंप मिळतात?
प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ एचपी,५ एचपी आणि ७ एचपी कृषी सोलर पंपांचे वाटप करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून महा ऊर्जास १ लाख ४ हजार ८२३ सौर कृषी पंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे.
👉🏻अनुदान किती मिळते?
सदर योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान दिले जाते.त्यामुळे उर्वरित ५ टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते.तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी सौर पंप खरेदी करण्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते.तसेच उर्वरित १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागते.
👉🏻अर्ज कुठे करायचा?
इच्छुक तसेच पात्र शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.यासाठी शेतकऱ्यांना या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.राज्यात नुकताच पीएम कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
👉🏻संदर्भ :Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.