कृषी वार्ताTV9 Marathi
3000 रू. मासिक पेंशन ‘या’ योजनेअंर्तगत!
पेंशन म्हटले की, डोळयासमोर शासकीय नोकरी येते. पण आता शेतकरी ही थोडी थोडी गुंतवणूक करून आपल्या भविष्याचा विचार करून दरमहा पेंशन घेऊ शकतात. यासाठी शासन पीएम श्रम योगी मानधन योजना राबवित आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर मासिक पेंशन मिळू लागते. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी वृद्धापकाळात म्हणजेच सेवानिवृत्ती विमा योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. शेतकऱ्याला मासिक 3000 रुपये पेन्शन मिळू शकते. गुंतवणूक लवकर आणि योग्य वेळी सुरू केल्यास या पेन्शनचा फायदा अधिक होऊ शकतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. दरमहा 3000 रुपये मिळविण्यासाठी, शेतकर्‍यांनी त्यांच्या सध्याच्या वयानुसार, योजनेत 55 ते 200 रुपये प्रति महिना गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ही विमा योजना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला लाभ देखील प्रदान करते. पीएम श्रम योगी मानधन योजनेस आवश्यक कागदपत्रे: 1. आधार कार्ड 2. ओळखपत्र 3. वय प्रमाणपत्र 4. उत्पन्नाचा दाखला 5. शेतीचा सातबारा 6. बँक खाते पासबुक 7. मोबाईल क्रमांक 8. पासपोर्ट आकाराचा फोटो 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
10
इतर लेख