AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गव्हावरील सीमा शुल्कात 30% वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
कृषि वार्तादैनिक भास्कर
गव्हावरील सीमा शुल्कात 30% वाढ, शेतकऱ्यांना दिलासा
सरकारने गव्हाच्या स्वस्त आयातीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादकांचे हित जपण्यासाठी गव्हावरील सीमा शुल्काचा दर 20% वरून 30% पर्यंत वाढवला आहे त्याशिवाय, अक्रोडाच्या कवचावरील आयात शुल्क सुद्धा 30% वरून 100% पर्यंत वाढवण्यात आले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) बुधवारी रात्री अधिसूचना काढून ही माहिती दिली.
देशांतर्गत बाजारपेठांमधील विक्रमी उत्पादनाचा आणि विशेषत: रशियातून होणाऱ्या स्वस्त आयातीच्या धोक्याचा विचार करून गव्हावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ञांनी असे म्हटले आहे की सरकारला जागतिक बाजारपेठेतून गव्हाच्या खरेदीवर निर्बंध घालायचा आहे म्हणजे गव्हाच्या देशांतर्गत किंमतीवर दबाव येणार नाही आणि 2017-18 पीक वर्षासाठी (जुलै-जून) शेतकऱ्यांना कमीत कमी 1,735 रुपये प्रती क्विन्टल इतका हमी भाव मिळेल. अधिकृत आकडेवारीनुसार, शेतकऱ्यांनी 2017-18 मधील गव्हाच्या पिकाची काढणी बहुतांशी पूर्ण केली आहे आणि सरकारने आपल्या हमी भावाने आत्तापर्यंत 3.33 दशलक्ष टन गव्हाची खरेदी पूर्ण केली आहे. पीठ गिरणी मालकांच्या म्हणण्यानुसार, जर सरकारने सीमा शुल्क वाढवले नसते तर, गव्हाच्या विक्रीवर परिणाम झाला असता. 2017-18 च्या दरम्यान, 14.8 दशलक्ष टन गव्हाची भारतात आयात करण्यात आली. संदर्भ - दैनिक भास्कर 25 मे 2018
17
0