समाचारTV9marathi
30 सप्टेंबरपर्यंत करा हे काम अन्यथा पैसे अडकणार!
➡️ भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत त्यांचे पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची सूचना दिलीय. खातेधारक बँकिंग सुविधेमध्ये लिंक करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांना अडचणी येऊ शकतात, असंही बँकेनं सांगितलंय.
बँकिंग सेवेसाठी पॅन आधार जोडण्याची शिफारस
➡️ एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना कोणत्याही गैरसोयी टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा आनंद घेण्यासाठी त्यांचे पॅन आधार (पॅन-आधार कार्ड लिंक) सह जोडण्याची शिफारस करतो.
➡️ पॅनला आधारशी जोडणे अनिवार्य आहे. जर 30 सप्टेंबरपूर्वी पॅन आणि आधार जोडलेले नाहीत, तर पॅन निष्क्रिय होईल आणि कोणत्याही व्यवहारात वापरता येणार नाही.
आधारला पॅनशी जोडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत
➡️ आधारला पॅनशी जोडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. कोणतीही व्यक्ती जो पॅनला आधार कार्डाशी जोडण्यात अपयशी ठरला, आधार क्रमांक कळवल्याशिवाय किंवा लिंक होईपर्यंत त्यांचे पॅन निष्क्रिय राहील.
SMS द्वारे लिंक करा
➡️ तुम्ही एसएमएसद्वारे पॅन-आधार लिंक करू शकता. जर तुम्हाला संदेशाच्या मदतीने पॅन-आधार लिंकिंग करायचे असेल तर सर्वप्रथम एसएमएस चॅट बॉक्समध्ये UIDPAN टाईप करा मग <SPACE> 12 अंकी आधार क्रमांक SPACE 10 अंकी पॅन नंबर 567678 किंवा 56161 वर टाइप करून मेसेज करा.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- TV9 Marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.