AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
27 लाख शेतकऱ्यांचे 'या' चुकांमुळे अडकतील पैसे!
कृषि वार्ताNews 18 lokmat
27 लाख शेतकऱ्यांचे 'या' चुकांमुळे अडकतील पैसे!
👉 तुम्ही देखील पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी केली आहे तर लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. 👉 नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टमध्ये पाठवला जाईल.मात्र शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पैसे अडकून जातात. 👉 PM किसानच्या पोर्टलनुसार, 27 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या रकमेचं ट्रान्झॅक्शन फेल झालं आहे. शेतकऱ्यांच्या छोट्या चुकांमुळे त्यांना पैसे मिळाले नाही आहेत. तुम्ही आयएफएससी कोडी, बँक खाते क्रमांक किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणती चूक केली असेल तर सर्वात आधी ही चूक सुधारा. जेणेकरुन पुढचा हप्ता मिळताना कोणतीही समस्या येणार नाही. या कारणामुळे अडकतील पैसे १)शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्ये असणं आवश्यक आहे २)अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलात शेतकऱ्याच्या नावाची स्पेलिंग वेगवेगळी असल्यास ३)आधार कार्डावरील नाव अर्जावर असणं आवश्यक ४)आयएफएससी कोड चुकीचा असल्यास अडकतील पैसे ५)बँक खाते क्रमांक योग्य नसल्यास पैसे अडकतील ऑनलाइन सुधारा तुमच्या चुका सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा. त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता, तर खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता. शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता.
14
4
इतर लेख