AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
2.5 लख कोटींचा अतिरिक्त खर्च; ‘या’ गोष्टींवर मिळणार सबसीडी!
कृषी वार्ताTV9 Marathi
2.5 लख कोटींचा अतिरिक्त खर्च; ‘या’ गोष्टींवर मिळणार सबसीडी!
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला, मात्र आता देश हळूहळू कोरोनाच्या सावटातून सावरत असून, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. दरम्यान अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी सरकार २.५ लख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पैशांमधून अन्न प्रक्रिया उद्योग आणि रासायनिक खते व औषधांवर सबसीडी देण्यात येणार आहे. अन्न व खतांवर मिळणार सबसीडी कोरोना काळामध्ये गरिबांना अन्न मिळावे यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ती फक्ती तीन महिन्यांसाठी मर्यादीत होती. मात्र त्यानंतर या योजनेमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. तसेच खतांच्या खरेदीवर देखील मोठ्या प्रमाणात सबसीडी देण्यात आली आहे. मनरेगासाठी 30 हजार कोटी केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील लोकांना मनरेगा अंतर्गंत दर वर्षी 175 दिवसांचा रोजगार पुरवण्यात येतो. मनरेगा योजनेंतर्गत गावातील विविध विकास कामे करण्यात येतात. त्यामुळे या योजनेसाठी देखील केंद्राच्या वतीने 30 हजार कोटींचा अतिरिक्त निधी खर्च करण्यात येऊ शकतो. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- TV9 Marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
19
1