AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
20,000 रुपये पगाराची नोकरीची संधी!
नोकरीlokmat.news18
20,000 रुपये पगाराची नोकरीची संधी!
नागपूर महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निशामक विमोचक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२२ असणार आहे. अग्निशामक विमोचक - एकूण जागा १०० शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एसएससी (दहावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. महाराष्ट्र तंत्रशिक्षण महामंडळ आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. शारीरिक पात्रता १) उंची - १६५ cm किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे. २) वजन - ५० KG किंवा त्याहून अधिक असणं आवश्यक आहे. ३) छाती - ८१ cm फुगवून ५ cm अधिक असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार - २०,०००/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक १) (बायोडेटा) २) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं ३) शाळा सोडल्याचा दाखला ४) जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ५) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) ६) पासपोर्ट साईझ फोटो अधिक माहितीसाठी - https://www.nmcnagpur.gov.in/ संदर्भ:- lokmat.news18 हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
18
12
इतर लेख