AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी!
कृषी वार्ताtv9marathi
2000 रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी!
➡️ 2000 रुपयांच्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. खरं तर 2000 रुपयांच्या नोटांचा नवीन पुरवठा होणार नसल्याचं 26 मे रोजी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं होतं. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर लाँच करण्यात आलेल्या या नोटांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या नोटा आता हळूहळू चलनातील पुरवठ्यातून कमी होत आहेत. त्याचबरोबर या नोटा यापुढे नव्याने येणार नाहीत, या आधीपासूनच ठरलेलं आहे, असं आरबीआयने यापूर्वीच 2000 रुपयांच्या नोटाविषयी सांगितले होते. 2020-21 या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा नाही ➡️ आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, मागील वर्षापर्यंत 2020-21 या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा पुरवठा झालेला नाही. रिझर्व्ह बँकेने अखेर 2018-19 मध्ये 467 लाख 2000 रुपयांच्या नोटांचा पुरवठा केला होता. अशा प्रकारे एकूण 2000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांचा वाटा 87.5 टक्के आहे. प्रश्न का उपस्थित होत आहेत? ➡️ एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटा काढून टाकल्यापासून 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत की काय, अशी अटकळ बांधली जात होती. कारण आता सरकारने 2000 रुपयांच्या नवीन नोटा छापणार नसल्याचेही सांगितले आहे. मार्च महिन्यात अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत ही माहिती दिली होती. गेल्या दोन वर्षांत 2000 च्या नोटा छापल्या गेल्या नाहीत, असंही त्यांनी सांगितलं होतं. सर्क्युलेशन अशा प्रकारे कमी होते? ➡️ सरकारी आकडेवारीनुसार, 30 मार्च 2018 पर्यंत 3 अब्ज 36 कोटी 20 लाखांच्या नोटा चलनात आल्या. तर 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत फक्त 2 कोटी 49 कोटी 90 लाख 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. त्याच वेळी 2019-20 आणि 2020-21 दरम्यान 2000 रुपयांच्या बँक नोटांच्या छपाईशी संबंधित कोणताही आदेश सरकारने जारी केलेला नाही. याचा अर्थ या नोटांचे मुद्रण 2019-20 पासून थांबले आहे. एटीएममधूनही 2 हजारांच्या नोटांची संख्या कमी झाली ➡️ बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, बँकेच्या एटीएममधील नोटांच्या कॅसेटमधून 2000 रुपयांच्या नोटांच्या कॅसेट काढून टाकल्यात. 2000 च्या नोटांच्या कॅसेटची जागा 100 रुपये आणि 200 रुपयांच्या कॅसेटने घेतली आहे. हेच कारण आहे की, बहुतेक एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा नसतात. काळ्या पैशाला पुन्हा एकदा वाढेल, या उद्देशानंच सरकारने 2000 रुपयांच्या नवीन नोटा न छापण्याचा निर्णय घेतला. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
4
इतर लेख