AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
2 लाखांचा मोफत फायदा; ‘हे’ ग्राहक असणार लाभार्थी !
योजना व अनुदानTV9 Marathi
2 लाखांचा मोफत फायदा; ‘हे’ ग्राहक असणार लाभार्थी !
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना मोफत दोन लाख रुपयांचा अपघाती विमाचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र ग्राहकांचे प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. क्लेम कसा करावा? संबंधित व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ घेण्यासाठी बेनिफिशरी म्हणून ज्या व्यक्तीचे नाव असेल, त्या व्यक्तीला एसबीआयचा एक क्लेम फॉर्म भरावा लागणार आहे. त्या फॉर्मसोबत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, अपघाती मृत्यू झाल्याची एफआयआरची कॉपी आणि मृत व्यक्तीचे आधारकार्ड जोडावे लागणार आहे. सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर बेनिफिशरी व्यक्तीला विम्याची रक्कम मिळेल. मात्र अपघाती मृत्यू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत ही सर्व प्रक्रिया करणे आवश्यक आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
2
इतर लेख