AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
17 वा हप्ता- खात्यात पैसे जमा झाले का नाही?
योजना व अनुदानAgroStar
17 वा हप्ता- खात्यात पैसे जमा झाले का नाही?
👉🏻पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता 18 जून रोजी जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ₹ 2000 जमा करण्यात आले आहेत.पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पैसे जारी केल्यानंतर, सर्व शेतकरी बांधव घरी बसून तपासू शकतात की त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आले आहेत की नाही, म्हणजेच घरी बसून तुम्हाला समजेल की जर आता पर्यंत पैसे आले नाही तर काय अडचण आहे. 👉🏻पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सुमारे 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे. 👉🏻पीएम किसान योजनेच्या हप्त्याची स्थिती तपासण्याची प्रक्रिया : - सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल. - वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन घ्यावे लागणार आहे. लॉगिन घेतल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला Farmers Corner हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. - मग Beneficiary Status हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील यापैकी एक निवडा आणि माहिती सबमिट करा. -मग तुम्हाला खात्यात रक्कम जमा करण्यात आली की नाही याची माहिती मिळणार आहे. किंवा मग Know Your Status हा पर्याय निवडा आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस चेक करता येणार आहे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
106
0
इतर लेख