AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
16 वा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही?
समाचारAgroStar
16 वा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही?
👉🏻पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये 28 फेब्रुवारीला PM किसानच्या 16 वा हप्त्याचं वितरण करण्यात आलं.देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 16 वा हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे. PM किसानच्या 16 वा हप्ता कुठे कराल चेक? 👉🏻तुम्ही लाभार्थी असाल तर, तुम्ही मेसेजद्वारे हप्त्याचे पैसे तपासू शकता. तुम्हाला सरकारकडून आणि बँकेकडूनही एक मेसेज येतो ज्यामध्ये तुम्हाला 2 हजार रुपयांचा हप्ता ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली जाते. 👉🏻जर काही कारणास्तव तुम्हाला हप्त्याचा मेसेज आला नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या खात्यात 16 व्या हप्त्याचे पैसे आले आहेत की नाही ते तपासू शकता. 👉🏻तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन पासबुक एंट्री करून तुम्ही हप्त्याची रक्कम खात्यात ट्रान्सफर झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. 👉🏻हप्ता जमा झाला आहे का ऑनलाईन चेक करण्यासाठीअधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा. 👉🏻यानंतर, होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका. 👉🏻त्यानंतर 'गेट स्टेटस' वर क्लिक करा. 👉🏻आता तुमच्या पेमेंटची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल. 👉🏻कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही? या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी आणि योजनेत नोंदणी करताना चुकीची माहिती प्रविष्ट केली होती. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसानचे पैसे आले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. योजनेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून ते योग्य मदत घेऊ शकतात. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
85
5
इतर लेख