समाचारAgrostar
14,500 शाळा होणार अपग्रेड; केंद्राकडून 'पीएमश्री' योजनेची घोषणा!
➡️केंद्र सरकारनं आता देशातील शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार देशभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन होणार आहे. यासाठी 'पीएमश्री' ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.
➡️शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधानांनी काही घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की , शिक्षण दिनानिमित्त मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेअंतर्गत भारतभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन करण्यात येईल. यामुळं ही मॉडेल स्कूल होतील ज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा संपूर्ण आत्मा अंतर्भूत होईल.
➡️राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं अलिकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. मला खात्री आहे की शाळांचा राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळं भारतातील लाखो विद्यार्थ्यांना आणखी फायदा होईल. शाळांमध्ये शिक्षणाची आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण पद्धत असेल. तसेच शोध केंद्रीत शिक्षण पद्धतीवर भर दिला जाईल. अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि बरेच काही या नव्या योजनेंतर्गत येईल. तसेच शाळांमधील आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रीत केलं जाईल, असंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
➡️संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.