AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
12 कोटी लोकांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात जमा होणार 'इतकी' रक्कम!
कृषी वार्तालोकमत
12 कोटी लोकांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात जमा होणार 'इतकी' रक्कम!
➡️ कोरोना संकट काळात लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे, ज्यामुळे जगभरातील प्रत्येक व्यक्ती चिंतेत आहे. कोरोना व्हायरसची दुसरी लाट मंदावली असली तरी अद्याप धोका संपलेला नाही. अशा परिस्थितीत आता मोदी सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. शेतकऱ्यांच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या खात्यात 2000 रुपयांचा 9 वा हप्ता सरकार पाठविणार आहे. हा हप्ता 2000 रुपयांचाऑगस्ट महिन्यात पाठविण्यात येणार आहे. ➡️ पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. 6 हजार रूपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये अशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. सर्व पात्र शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळावा याची काळजी घ्यावी, अशी मागणी केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून नोंदणीकृत (रिजस्टर्ड) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 8 हप्ते जमा करण्यात आले आहेत. ➡️ दरम्यान, पहला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. जर कागदपत्रे योग्य असतील तर जवळपास 12 कोटी नोंदणीकृत शेतकर्‍यांना नवव्या हप्त्याचा लाभ देखील मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी आपली नोंद तपासावी. जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. नोंदणीमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता योजनेंतर्गत तुम्ही घरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकता. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे.यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पानावर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
3
इतर लेख