AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
12वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी!
नोकरीtv9marathi
12वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी!
➡️बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. सोबत स्पोर्ट्स क्वोटामध्ये असलेल्या आणि बारावी पास झालेल्यांना सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात हेड कॉन्स्टेबलपदासाठी नोकरीची संधी आहे. ➡️केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात भरती केली जाणार आहे. या भरतीप्रकियेला सुरुवात झाली असून याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहेत. ➡️२४९ पदांवर सीआयएसएफ हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. cisf.gov.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येऊ शकेल. ➡️वय वर्ष १८ ते २३ असलेल्यांना या पदसाठी अर्ज करता येऊ शकेल. तसंच एससी आणि एसटीसाठी वयात पाच वर्षांची सूटही दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. तर ओबीसी वर्गासाठी उमेदवारांना ती वर्षांची सूट दिली जाणार आहे. वयोमर्यादेची पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सीआयएफच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विस्तृत माहिती मिळवता येऊ शकेल. ➡️संपूर्ण प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळाल्यास २५ हजारपासून ते ८1 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना निवड प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. यासाठी इच्छुक उमेदावारांना ३१ मार्चच्या अगोदर आपला अर्ज द्यावा लागणार आहे. ➡️सीआयएसएफमध्ये भरती होण्यासाठी बारावी पास आणि स्पोर्ट्स कोटामध्ये प्रतिनिधित्व केलेलं असणं महत्त्वाचं आहे. संदर्भ:-TV9Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
2