नोकरी आणि शिक्षणAgrostar
10 हजार पदांची भरती!
➡️शासनाच्या विविध विभागांतर्गत भरतीच्या जाहिराती निघणार आहेत. याचा फायदा नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणाई ला होणार आहे.राज्याच्या आरोग्य विभागात लवकरच दहा हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली व या भरतीची जाहिरात येत्या 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2023 दरम्यान येणार असल्याचे म्हटले जात आहे.
➡️या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान घेण्यात येणार असून 27 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत आम्ही सर्व जागा भरून नियुक्ती पत्र देणार असल्याचे देखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. पुढे त्यांनी या भरतीच्या वेळापत्रक याबद्दल सांगितले की, 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल व त्यानंतर महिनाभराच्या कालावधीत या संबंधीच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील.
➡️त्यानंतर 25 जानेवारी ते 30 जानेवारी याकाळामध्ये प्राप्त अर्जांची छाननी होईल. नंतर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत असे देखील त्यांनी म्हटले. तसेच या भरतीची परीक्षा ही 25 ते 26 मार्च दरम्यान होईल. आणि या परीक्षेचा निकाल 27 मार्च ते 27 एप्रिल या दरम्यान जाहीर करून उमेदवारांना नियुक्ती देखील देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
➡️संदर्भ:-Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.