नोकरीAgrostar
10-12वी पास विद्यार्थ्यांसाठी आर्मीमध्ये मोठी संधी !
➡️आर्मी सिलेक्शन सेंटर ईस्ट अलाहाबादने स्टेनोग्राफर ग्रेड-II, रूम ऑर्डरली, मेस वेटर, मेसेंजर, वॉचमन, गार्डनर, हाऊसकीपर गट C श्रेणीतील पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.10वी/12वी पास असलेले उमेदवार ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत (7 मे 2022) या पदांसाठी अर्ज करू शकतात.
➡️पुढील पदांवर भरती सुरू आहे :
१.स्टेनोग्राफर ग्रेड-II - 4 पदे
२.रूम ऑर्डरली - 5 पदे
३.मॅश वेटर - 1 पोस्ट
४.मेसेंजर - 1 पोस्टवॉचमन - 4 पदे
५.गार्डनर - 1 पोस्ट
६.हाउसकीपर - 3 पदे
➡️उमेदवारासाठी पात्रता :
१.स्टेनोग्राफर ग्रेड-II :
या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा. सोबतच, डिक्टेशनमध्ये 10 मिनिटांत 80 WPM टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.केवळ तेच उमेदवार रूम ऑर्डरली, मॅश वेटर, मेसेंजर, वॉचमन, गार्डनर आणि हाउसकीपर या पदांसाठी अर्ज करू शकतात, ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण केली आहे.उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 25 वर्ष असावे.
➡️उमेदवाराची निवड अशी होईल :
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
स्टेनोग्राफर ग्रेड-II- निवडलेल्या उमेदवारांना रु.25500 ते रु.81100 प्रति महिना पगार दिला जाईल.
रूम ऑर्डरली, मॅश वेटर, मेसेंजर, वॉचमन, गार्डनर आणि हाउसकीपर या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 18000 ते 56900 प्रति महिना वेतन दिले जाईल.
➡️अर्ज कसा करायचा :
उमेदवार ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 21 दिवसांच्या आत (7मे 2022) आर्मी सिलेक्शन सेंटर पूर्व अलाहाबाद येथे ऑफलाइन अर्ज सबमिट करू शकतात. कोणताही TA/DA स्वीकार्य नाही.
➡️ संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.