AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10 हजारात सुरू करा व्यवसाय, दरमहा होईल 1 लाख रुपयांची कमाई!
व्यवसाय कल्पनाNews 18 lokmat
10 हजारात सुरू करा व्यवसाय, दरमहा होईल 1 लाख रुपयांची कमाई!
👉 कोरोना काळात सगळ्यांनाच व्यवसाय करण्याचं महत्त्व कळालं आहे. या व्यवसायातील उत्पादनाला घरोघरी प्रचंड मागणी आहे त्यामुळे तुम्ही प्रचंड कमाई करू शकता. या व्यवसायात तुम्ही सुरुवातीला केवळ 10 हजार रुपये गुंतवून मोठी कमाई करू शकता. 👉 हा व्यवसाय आहे डेअरी फार्मिंगचा. दूध माणसाला दररोज लागतं आणि दुधाचे पदार्थ घरोघरी, हॉटेलांत वापरले जातात त्यामुळे हा व्यवसाय सुरू केल्यानंतर मंदी आली तरीही चिंता नाही. जरी तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तरीही काळजी करू नका. तुम्हाला केंद्र सरकार मदत करू शकतं. तर जाणून घेऊया तुम्हाला बंपर कमाई करून देणारा व्यवसायाबद्दल. कसा सुरू करायचा डेअरी फार्मिंगचा व्यवसाय? 👉 लहान स्वरूपात व्यवसाय सुरू करताना तुम्ही कमी गायी आणि म्हशी विकत घेऊ शकता नंतर गरजेनुसार जनावरांची संख्या (Number of cattle) वाढवता येईल. त्यासाठी सर्वोत्तम जातीच्या गायी आणि म्हशी खरेदी करा आणि त्यांची योग्य व्यवस्था करा. त्यांना चांगल्या दर्जाचा चारा द्या म्हणजे दूधाचं उत्पादन वाढेल आणि कमाई वाढेल. तुम्ही तुमच्या नावे डेअरी फार्म सुरू करू शकता. 2 जनावरांपासून सुरू करू शकता हा व्यवसाय 👉 तुम्ही जर छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर दोन गायी किंवा म्हशी विकत घेऊन डेअरी व्यवसायाला सुरुवात करू शकता. पण हे मात्र लक्षात ठेवा जनावरं खरेदी करतानाच ती उच्च जातीची आणि भरपूर दूध देणारी असतील याची काळजी घ्या. कारण जर तुम्ही योग्य निवड केली नाही तर जनावरांचं दूध कमी येईल आणि तुम्हाला तोटा होईल. त्यामुळे गरज भासल्यास पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने जनावरं खरेदी करा. जनावरं खरेदी करायला तुम्हाला 35 ते 50 हजार रुपयांपर्यंतचं अनुदान सरकारी योजनांतून मिळू शकते. सरकारचं 2.5 लाखांचं अनुदान मिळू शकतं 👉 डेअरी फार्मिंग उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने डेअरी उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे. आधुनिक डेअरी तयार करणं हा या योजननेचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देणं हाही उद्देश आहे. शेतकरी आणि गुराख्यांनी डेअरी फार्म सुरू करावं आणि आपलं उत्पन्न वाढवावं अशी अपेक्षा सरकारला आहे. त्यामुळेच सरकार या व्यवसायात येणाऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देत आहे. या योजनेअंतर्गत बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलं जातं. जर तुम्हाला 10 जनावरांचं डेअरी फार्म उघडायचं असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयांचा खर्च येईल. केंद्रीय कृषी मंत्रालयाने DEDS योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयांचं अनुदान देऊ केलं आहे. नाबार्डच्या वतीने हे अनुदान दिलं जातं. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
12