AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10 शेळ्या आणि 2 बोकड गट वाटप योजनेला हिरवा कंदील !
योजना व अनुदानAgroStar
10 शेळ्या आणि 2 बोकड गट वाटप योजनेला हिरवा कंदील !
🐐 पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटप राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची किंवा मेंढ्या आणि नर मेंढ्यांची आधारभूत किंमत वाढवण्यास 12 मे 2021 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने प्रदान केलेली आहे. 🐐 10 शेळ्या आणि 2 बोकड गट वाटप शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च यासाठी रुपये 2,31,400/- इतका आहे. या योजनेअंतर्गत गटाची स्थापना करताना लाभार्त्याला सुरुवातीला शंभर टक्के निधी स्वतः किंवा वित्तीय संस्थेचे म्हणजेच बँकेचे कर्ज याद्वारे उभा करावा लागणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील. तथापि प्रति गट कमीत कमी रुपये 1,15,700/- याप्रमाणे अनुदान देय राहील. 🐐 शेळी गट वाटप योजनेचा तपशील ▶ या योजनेअंतर्गत २० शेळ्या खरेदीसाठी दर प्रति शेळी 6,000/- रुपये असणार आहे. या गटाची20 शेळी गटाची अपेक्षित एकूण किंमत 1 लाख 20 हजार एवढी असणार आहे. ▶ दोन बोकड खरेदी करण्यासाठी प्रति बोकड दर हा 8,000/- रुपये असणार आहे. बोकड गटाची एकूण किंमत 16,000/- रुपये असणार आहे. ▶ शेळ्यांचा वाडा बांधण्यासाठी 450 चौरस फूटाचा असून प्रति शेळी किंवा बोकड 212 रुपये प्रति चौरस फूट या दराने एकूण शेळ्यांच्या वाडा बांधण्याची किंमत 95,500/- एवढी असणार आहे. ▶ असे 20 शेळ्या, 2 बोकड आणि शेळ्यांचा वाडा यांची होणारी एकूण खर्च करावयाची रक्कम 2,31,400/- ( अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) एवढी असणार आहे. ▶ एकूण शेळी गट बोकड आणि शेळ्यांच्या वाड्यांचा किमतीच्या 50 टक्के म्हणजेच 2,31,450/- (अक्षरी रुपये दोन लाख एकतीस हजार चारशे) च्या 50 टक्के 1,15,700/- (अक्षरी रुपये एक लाख पंधरा हजार सातशे) एवढे अनुदान देय असेल. 🐐 संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
0
इतर लेख