AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10 वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टऑफिस मध्ये मोठी भरती!
नोकरीलोकमत
10 वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टऑफिस मध्ये मोठी भरती!
➡️ दहावी पास तरुणांना पोस्टात नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. भारतीय टपाल विभागात आपल्यासाठी बंपर जॉबच्या संधी उपलब्ध आहेत ➡️सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना भारतीय टपाल विभागाने उत्तम संधी दिली आहे. टपाल खात्याने अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे. ➡️भारतीय टपाल विभागाच्या पंजाब सर्कलने असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ केडर या पदाच्या रिक्त जागा जाहीर केल्यात. यापैकी कुठल्याही प्रकारासाठी अर्ज करायचा असेल तर इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर indiapost.gov.in वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, ➡️अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे. उमेदवार https://www.indiapost.gov.in/va/Pages/IndiaPostHome.aspx येथे जाऊन थेट अर्ज करू शकतात. जागा टपाल विभागाच्या पंजाब सर्कलमध्ये पोस्टल सहाय्यकासाठी 45 जागा, सॉर्टिंग सहाय्यकासाठी 9 पदे रिक्त आहेत. याशिवाय मल्टी टास्किंग स्टाफच्या 3 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्रता 👉 जर आपल्याला पोस्टल सहाय्यक किंवा सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 पास असणं आवश्यक आहे. यासह अर्जदारास संगणकाच्या मूलभूत ज्ञानाचे प्रमाणपत्र देखील मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले असावे. वयोमर्यादा 👉 टपाल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्जदारांचे वय 18 ते 27 वर्षे असावे. त्याच वेळी मल्टी-टास्किंग स्टाफसाठी ते 18-25 वर्षे असावे. आरक्षित अर्जदारांना नियमानुसार वयाची सवलत देण्यात येईल. पगार 👉सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक पदाचा पगार 25500 ते 81100 रुपयांपर्यंत दिला जाणार आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफच्या उमेदवारांना 18000 ते 56900 पर्यंत पगार देण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
16
इतर लेख