AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी!
नोकरीNews 18 lokmat
10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी!
➡️रेल्वे भरती सेलने पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बंपर भरती काढली आहे. जाहिरातीनुसार, रेल्वेच्या हावडा, सियालदाह, आसनसोल, मालदा, कांचरापारा, लिलुआ आणि जमालपूर विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३३६६ जागा रिक्त आहेत. ➡️या अप्रेंटिसशिप ट्रेनी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ४ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. यासाठी तुम्ही रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या www.rrcer.com या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. नोटीसनुसार, अर्ज केल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ➡️या अप्रेंटिसशिप ट्रेनी भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता उत्तीर्ण असावे. यासह, उमेदवाराकडे NCVT / SCVT द्वारे जारी केलेले ट्रेड सर्टिफिकेट देखील असावे, नोटीसनुसार, रेल्वे प्रशिक्षणार्थी भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे आणि जास्तीत जास्त २४ वर्षे असावे. पात्रतेच्या आधारे अप्रेंटिसशिप ट्रेनीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. रिक्त पदांचा तपशील- हावडा विभाग - ६५९ पदे सियालदाह विभाग - ११२३ पदे आसनसोल विभाग - ४१२ पदे मालदा विभाग - १०० पदे कांचरापारा विभाग - १९० पदे लिलुआ विभाग - २०४ पदे जमालपूर विभाग - ६७८ पदे अर्ज शुल्क- सामान्य श्रेणीच्या (ओपन) उमेदवारांना १०० ​रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, SC/ ST/ PWBD/ महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
15
इतर लेख