AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10 लाख हेक्टरवर औषधी लागवड,शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार!
कृषी वार्ताTV9marathi
10 लाख हेक्टरवर औषधी लागवड,शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार!
➡️ आपला देश जैवविविधतेच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. भारतातील झाडं, झाडे आणि पिके केवळ आपल्या अन्नाची गरज पूर्ण करत नाहीत तर औषधी गुणधर्मांनी देखील संपन्न आहेत. जे शेतकरी विशेषतः हर्बल शेतीशी जोडलेले असतील तर ते त्यातून चांगला नफा देखील मिळवू शकतात. बाजारात खूप मागणी असल्यानं शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीतून चांगली आर्थिक कमाई करु शकतात. सरकारनं या जैवविविधतेचा फायदा शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी पावलं उचलली आहेत. 8000 झाडे आणि रोपांचा औषधांसाठी वापर ➡️ भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 8000 झाडे आणि रोपांचा वापर औषधा साठी केला जातो. त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांना आणि औषधांना परदेशात चांगली मागणी आहे. या मागणीमुळे शेतकऱ्यांसाठी हर्बल शेतीचा नवा पर्याय खुला झाला आहे. औषधी वनस्पतींची हर्बल शेती करुन शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न 5000 कोटी रुपये असेल ➡️ राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मदत केली आहे. येत्या काही वर्षांत 10 लाख हेक्टर क्षेत्र 4000 कोटी रुपये खर्च करून औषधी वनस्पतींच्या लागवडीखाली आणली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 5000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. ➡️ औषधी वनस्पतींच्या प्रादेशिक बाजारपेठांचे जाळंही निर्माण करण्यात येणार आहे. औषधी वनस्पतींची शेती देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अश्वगंधा, गिलोय, भृंगराज, सातवार, पुदिना, मोगरा, तुळशी, कोरफड, ब्राह्मी, शंखपुष्पी आणि गुलर इत्यादी अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्याची लागवड शेतकरी करू शकतात आणि आर्थिक कमाई करु शकतात. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
9
इतर लेख