AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
समाचार न्यूज १८ लोकमत
10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
➡️महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहमदनगर इथे लवकरच दहावी उत्तीर्ण उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. ➡️यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लाईनमन, संगणक चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी भरती 1)लाईनमन - एकूण जागा २९१ 2) संगणक चालक - एकूण जागा २९ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ➡️या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे . ➡️तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. ➡️उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे. ➡️खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी ५५ टक्के गुण आवश्यक आहे. ➡️तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी ५० टक्के गुण आवश्यक आहे. ➡️दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक 1)Resume (बायोडेटा) 2)दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं 3)शाळा सोडल्याचा दाखला 4)जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5)ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) 6)पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०५ जानेवारी २०२२ संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
67
21
इतर लेख